झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिसला भेट

ऑक्टोबर 17, 2022 6:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । भारतीय डाक विभागातर्फे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” ९ ते१२ ऑक्टोबर”भारतीय पोस्ट सप्ताह ” साजरा करण्यात आला.या निमित्त ए.टी.झांबरे विद्यालयाच्या इ.५ वी.च्या विद्यार्थ्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस ला भेट दिली.या प्रसंगी मुख्य पोस्ट मास्तर या.एस.एम.कुलकर्णी यांचे बी.डी.झोपे यांनी व सहाय्यक पोस्ट मास्तर ललित बोरकर यांचे एस.एम.शिरसाठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी कुलकर्णी साहेबांनी पोस्ट सप्ताह चा उद्देश व त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच बोरकर यांनी भारतीय डाक विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या आधुनिक बदला संबंधी व भारतीय डाक विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमास एम.वाय. ठोसरे,व आर.एन तडवी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार ई.पी.पाचपांडे यांनी मानले.

jalgaon 2022 10 17T185354.669

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now