जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव शहरातील अयोध्या नगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आठ ते दहा जणांचा टोळक्याने एका डॉक्टराला मारहाण केली आहे. 45 वर्षीय डॉक्टरला मारहाण करताचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मेडिकल समोर उभ्या तरुणांना शिवीगाळ करू नका अस डॉक्टर बोलल्याचा राग आल्याने पाच ते सात तरुणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या बेदम मारहाणीत डॉक्टर जखमी असून नाक आणि हाता पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टोळक्याकडून बेदम मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ समोर आला आहे.पाच ते सात जण तरुण एका डॉक्टरला नाका तोंडातून रक्त निघे पर्यंत मारहाण करत असल्याचा व्हीडिओ मध्ये दिसत आहे.











