जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचा उद्या, १३ जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता, भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने संपूर्ण शहरात विविध सामाजिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी आणि सभागृह नेते नितीन लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान, अन्नदान आणि शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक:
सर्वप्रथम सकाळी ८.३० वाजता मंडल क्रमांक ३ च्या वतीने शारदा आश्रम शाळेजवळील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर मंडल क्रमांक १ च्या वतीने शिवाजीनगर पूल परिसरात सकाळी ०९ वाजता तसेच असोदा रोडवरील बहिणाबाई नगर येथेही ०९:१५ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. सकाळी ०९:४५ वाजता जुने जळगाव येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून सकाळी १० वाजता युवा मोर्चाच्या वतीने पांजरापोळ गोशाळेत गाईंना चारा वाटप करण्यात येणार आहे.
मंडल क्रमांक २ च्या वतीने नानीबाई शाळेजवळील अंध व अपंग शाळेत फळवाटपाचा कार्यक्रम होणार असून महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडणार आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान आणि फळवाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल मंडळाच्या वतीने भजे गल्लीतील संत गाडगे बाबा निराधार केंद्रात अन्नदानाचा कार्यक्रम होणार असून मंडल अध्यक्ष अजित राणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जाणार आहे. मंडल क्रमांक २ च्या वतीने रिमांड होम येथे नगरसेविका अंकिता पाटील यांच्यातर्फे जेवणाचा कार्यक्रम तर विद्यार्थ्यांसाठी भोजन तसेच कपडे वाटपाचा कार्यक्रम चेतन तिवारी आणि राहुल लोखंडे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता महिला मोर्चाच्या वतीने वाहतूक पोलिसांना पिण्याचे पाणी आणि थंड पेयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मंडल क्रमांक ४ च्या वतीने सिंधी कॉलनीतील मालवाहतूक रिक्षा स्टॉप परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, भारती सोनवणे, नितीन इंगळे, जयेश भावसार आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.










