विविध मागण्या : आदिवासी टोकरे कोळी समाजाचे खासदार रक्षा खडसेंमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

सप्टेंबर 3, 2022 4:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जळगाव जिल्हा ‘आदिवासी टोकरे कोळी जमात’च्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी रोजी खासदार रक्षा खडसे यांच्याउपस्थित जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

jalgaon 2022 09 03T163304.186 jpg webp

रावेर लोकसभा क्षेत्रातील “आदिवासी टोकरे कोळी जमात” पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसा आधी खासदार रक्षा खडसे यांची कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कोळी समाज बांधवांना शैक्षणिक व शासकीय कामकाजात येणाऱ्या जात प्रमाणपत्राच्या अनेक समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याअनुषंगाने आज खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनांत अप्पर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूर चे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्या व “आदिवासी टोकरे कोळी जमात” पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीत “आदिवासी टोकरे कोळी जमात” विद्यार्थी व नागरिकांना येणाऱ्या अडचणीबाबत खासदार रक्षा खडसे व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सविस्तर माहिती दिली तसेच सदर अडचणी तात्काळ सोडविण्यात याव्या, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूर चे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्यासह अशोक नामदेव कांडेलकर, पुरुषोत्तम कोळी, हरलाल रमेश कोळी, चंद्रकांत तोताराम भोलाणे, शाताराम तोताराम सपकाळे, रंगराव सिताराम देवराज, विनायक दुर्योधन कोळी, आत्माराम सुपडू कोळी, ईश्वर अशोक कोळी, पंकज सुधाकर कोळी, गुणवंत शामराव पिवटे, छगन सिताराम देवराज, गोपाळ यशवंत कोळी, संदीप शिरसाळे, अशोक चिंतामण शिरसाळे, भिका कडू सोनवणे, संजय पांडुरंग सपकाळे, सागर नामदेव कोळी, गोपाल यशवंत देवराज आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories