जळगाव लाईव्ह न्यूज। १४ ऑगस्ट २०२३। शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी सार्वे पिंप्री गावातील स्वामी समर्थ मंदिरात गावातील मुला मुलींना मार्गदर्शन केले. गोंडगाव येथील घटनेचा निषेध करून उपस्थित पालकांना, ग्रामस्थांना आपल्या पाल्यांवर मूल्य रुजवण्यासाठी, योग्य ते संस्कार करण्यासाठी,मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकमेकांमध्ये सुसंवाद असण्याची आवश्यकता आहे.
आपल्या पाल्यांसोबत सुसंवाद करणे आवश्यक आहे व त्यांना मोबाईल पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असे नमूद केले.श्री स्वामी समर्थांच्या आरतीचा लाभ देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला.याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. महेंद्र वाघमारे उपस्थित होते.गावातील ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.