इकरा युनानी मेडिकल कॉलेजमध्ये पार पडली लसीकरण मोहीम

ऑक्टोबर 30, 2021 5:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे शनिवार दि.३० रोजी इकरा युनानी मेडिकल कॉलेज येथे एक दिवसीय लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभागी होत लसीकरणाचा लाभ घेतला.

Iqra College jpg webp

लसीकरण मोहिमेचे उदघाटन इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ.करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य ईरफान ईकबाल शेख यांना युनानी मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या हस्ते कोरोनाची लस देऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी लस घेतली. यावेळी एजाज मलीक, अ. अजीज सालार, अमिन बादलीवाल, अ. रशीद शेख, जफर शेख, नबीदादा बागवान, प्रा. फरीदा लेहरी, प्रा. व्ही.टी पठाण, प्रा. अजीम शेख, प्रा. वसीम शेख, प्रा.डॉ. ईश्वर सोनगरे, रईस अमीर, सैय्यद मुख्तार, मिर्झा जाहिद आदी उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now