⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगावमध्ये अनोखा विवाह : 36 इंच उंचीचा वर आणि 31 इंच वधूने बांधली लग्न गाठ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । प्रेमात कोणत्याच गोष्टीला महत्व नसते. ना रंग, ना वय, ना उंची असं आपण फार सहज म्हणतो. मात्र, काही गोष्टी जेव्हा जगावेगळ्या घडतात. तेव्हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात हे नक्की! जळगावचा संदीप सपकाळे हा ३६ इंच उंचीचा तर धुळ्याची वधू उज्ज्वला ही ३१ इंच उंचीची आहे. हा अनोखा विवाह जळगाव येथे अगदी थाटात पार पडला. त्यामुळे जळगाव मध्ये या लग्नची चांगलीच रंगत चर्चा आहे.

शनिपेठेतील चौगुले प्लॉट परिसरातील वर संदीप संजय सपकाळे हा शिक्षित असून, तो शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत कामाला आहे. तर वधू ही धुळ्याची आहे. या लग्नाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या वधू आणि वराची उंची. ३६ इंच उंची असलेल्या संदीपला त्याची आयुष्याची साथीदार म्हणून ३१ इंची उज्ज्वला मिळाली आहे. सर्वसाधारण उंची असलेल्यांनादेखील अनुरूप मुलगी वा मुलगा मिळणे अवघड जाते. त्यात कमी उंचीच्या वराला वा वधूला आपल्या उंचीच्या अनुरूप जोडीदार मिळणे अधिक अवघड असते; मात्र संदीप व उज्ज्वला दोघेही एकमेकांना अनुरूप आहे.