जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव शेती शिवारातील कापसाच्या शेतीत ठिंबकच्या नळ्यांमध्ये अडकून एका काळवीटाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, ठिंबकच्या नळ्यांमध्ये अडकून फास बसून मृत्यु झाल्याचा अंदाज घटनास्थळावरून केलेल्या पंचनामातून दिसून आले.

तालुक्यातील नायगांव येथील महिला शेतकरी सिंधुबाई किसन म्हसाणे यांच्या शेती गट क्र.२०५ मधील कापसाच्या पिकात रात्री दोन नर जातीच्या कळवीटांमध्ये झुंज झाली असावी, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.जी. पाचपांडे, वनरक्षक दिपाली बेलदार, वनमजुर देवानंद ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.अश्विनी दाभाडे यांनी मृत कळवीटाचे शवविच्छेदन केले. मृत काळवीटाला डोलाखेडा येथे आणून अंत्यवीधी पार पाडला. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, वनपाल डी.जी. पाचपांडे, वनरक्षक दिपाली बेलदार, बी.बी.थोरात, वनजुर संजय सांगळकर, योगेश कोळी, देवानंद ठाकरे, वाहन चालक नवाब पिंजारी, वन समिती अध्यक्ष विनोद थाटे आदी उपस्थित होते.













