जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे संकट अधिक गडद होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक भागांवर बॉम्बफेक केली आहे. त्याचवेळी युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे याचना केली आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत असलेल्या नागपूरच्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीला एक व्हीडिओ पाठवून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. माजेपी स्ट्रीटवर खूप सारे बंकर तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. संपूर्ण इव्हानोमध्ये हायड्रोलेटिक पाईप, जिथून वीजेचा, पाण्याचा पुरवठा होत होता, त्याचठिकाणी हल्ला केला आहे. गावं आणि शहरांमध्ये वीज, पाणी याचा तुटवडा यावा म्हणून हा हल्ला केला आहे, अशी माहिती पवन मेश्रामने बीबीसी मराठीला दिली आहे.
सगळीकडं आणीबाणी निर्माण झाली आहे. बाहेर सगळीकडं धूर दिसत आहे. भारत सरकारनं येथील लोकांना एअरलिफ्ट करावं अशी आमची विनंती आहे. कारण सगळ्या फ्लाईट बंद झाल्या आहेत, इथं नो फ्लाइट झोन झालं आहे, त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे, अशी मागणी त्याने सरकारकडे केली आहे.
दरम्यान, भारतीय दूतावासाने 20 तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमानं 22, 24 आणि 26 तारखेला उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तिकीट प्रत्येकाने आपापलं काढायचं आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. मात्र, “एअर इंडियाचं विमानाचं तिकीट 60 ते 80 हजार रुपये आहे. आम्ही तिकीट काढू पण त्याचे दर थोडे कमी झाले तर बरं होईल. आमचे लेक्चर्स ऑनलाईन सुरू झाले आहेत. मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिकिटाचे दर कमी झाले तर चांगलंच आहे. नाहीतर आम्हाला तिकीट ज्या किमतीला उपलब्ध असेल ते घेऊन परतावं लागेल,” असं पवनने सांगितलं.
हे देखील वाचा :
- श्रीराम संस्थानतर्फे मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त कीर्तनासह महाभिषेक
- 10वी पास उमेदवारांसाठी गोल्डन चान्स ! रेल्वेत विनापरीक्षा थेट 3612 जागांसाठी भरती
- वेश्याव्यवसायाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
- विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी
- माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज