दोन घडीचा डाव त्याला मनसेचे नाव : एका काकांच्या विरोधामुळे ‘मनसेने’ उपक्रम थांबवला

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज चोपन्नावा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे हेच औचित्य साधून जळगाव शहर मनसेतर्फे वाहन चालकांना ५४ रुपये दराने पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येईल असा उपक्रम सुरु करण्यात आला होता. दुपारच्या सुमारास काही काळासाठीच हि संधी असल्याने वाहनचालकांनी चांगलीच गर्दी केली होती. मात्र जळगाव शहरातील एका काकांनी या उपक्रमावेळी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्याशी वाद घातला आणि यामुळे रुसून मनसेने हा उपक्रम बंद पडला.

mns 1 jpg webp

शहरवासीयांसाठी ५४ रुपये लिटर या दराने पेट्रोल उपलब्ध झाले असले तरी पेट्रोल चालकाला फरकाची रक्कम मनसेकडून देण्यात येणार होती. जळगावात मनसेकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, विनोद शिंदे, किरण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाहन चालकांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाली हि गर्दी पांगवण्यासाठी नागरिकांना एका रंगेत उभे रहा असे सांगण्यात आले होते.मात्र जळगाव शहरातील एका काकांनी हा उपक्रमावेळी मी तुम्हाला ओळखतो मी का रांगेत थांबू असे विचारले व जमील देशपांडे यांच्याशी हुझ्झत घातली. या शुल्लक कारणामुळे हा उपक्रम थांबवण्यात आला. इतर वेळी राज ठाकरे यांच्याशिवाय कोणालाही ना जुमानणारे मनसेचे कार्यकर्ते आज मात्र एका काकांवर रुसले आणि आपला स्तुत्य उपक्रम थांबवला.

मोदी सरकार खात्यात १५ लाख पाठवणार, तेल ५० रुपये किलो झाले, पेट्रोल १०० च्या आत आले, महागाई कमी झाली.. अशा घोषणा आत्ता केवळ चर्चा होऊन बसल्या आहेत परंतु जळगावात आज एका पेट्रोल पंपावर चक्क ५४ रुपये लिटर पेट्रोल मिळत आहे. अश्या प्रद्धतीची घोषणाकरून मनसे तर्फे राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे आवचीत्य साधून जळगाव शहरातील सागर पार्क समोरील पेट्रोल पंपावर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1212566626182233

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now