जळगाव लाईव्ह न्यूज : 30 सप्टेंबर 2023 : रावेर तालुक्यातील सावदा येथे भरधाव ट्रकने खासगी ट्रॅव्हल्सला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. तर काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
सावदा येथील श्री साईबाबा मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्या ट्रक (क्र. एमएच ०७ एचबी ४९४४) ने जळगावकडे जाणार्या एमएच १६ क्यू ९९८६ या क्रमांच्या खासगी बसला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, लक्झरीच्या चालकासह एक गंभीर जखमी असून, अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अंकलेश्वर ते बर्हाणपूर रस्त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मोठ मोठ्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी अलीकडेच नागिरकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.याप्रसंगी तात्काळ रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. तथापि, अद्यापही रस्त्याची दुरूस्ती सुरू करण्यात आलेली नाही.