जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात मागील पाच वर्षांपासून दररोज सकाळी न चुकता सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे. मुक्ताईनगर हे देशातील दुसरे तर राज्यातुन पहिले शहर आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सही कायमस्वरुपी १०० फुट उंचीवर ३०×२० आकाराचा ध्वज फडकविण्यात आला. यामुळे शहरवासीयांचा आनंद द्वगणित झाला आहे.

चांगदेव येथील स्वातंत्र्य सैनिक यांची पत्नी सुशिला काशिनाथ पाटील यांच्या हस्ते पहीले ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील,पोलीस प्रशासन व शहरवासीयांना सह तालुक्यातील नागरीकांनी हजेरी लावली. शहरातील सामाजिक कार्यकर्ते बबलु सापधरे यांच्यासह वंदे मातरम गृप व मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी काही तरुणांची ‘प्रवर्तन चौकात उंच ध्वज कायमस्वरुपी फडकविण्याची मागणी होती.’ याबाबत आमदार पाटील यांनी लक्ष घालून याबाबत पाठपुरावा केला.तसेच आमदार स्थानिक नीधीतुन चारच दिवसांत ध्वजस्तंभ उभारणीचे काम पुर्ण केले.













