माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथे वृक्षारोपण

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथे भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा व खान्देश नारीशक्ती गृप यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संपूर्ण राज्यात वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. फैजपूरात देखील भाजपा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा व खान्देश नारीशक्ती गृप यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनगर येथील व्यायामशाळा परिसरात चिंच,बेल यांसारख्या औषधी झाडांचे वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महिला सहसंपर्कप्रमुख सौ.दिपाली चौधरी झोपे, अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ,शितल अकॅडमी चे संचालक शुभम सैंदाणै सर, खान्देश नारीशक्ती सदस्या सौ. भारती पाटील, खान्देश फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील, देवेंद्र झोपे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सौ.दिपाली चौधरी यांनी तर सुत्रसंचलन संजय सराफ यांनी केले.