टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच; एका चार्जमध्ये धावणार ५४३ किमी, किंमत किती?

मे 30, 2026 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असताना टोयोटाने आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टोयोटा ने ‘अर्बन क्रूझर इबेला’ ही इलेक्ट्रिक कार अखेर भारतात अधिकृतपणे सादर केली असून आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, 543 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे ही इलेक्ट्रिक SUV बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे.

Urban Cruiser Ebella

टोयोटाने अर्बन क्रूझर एबेलाचा E3 व्हेरिएंट 23.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर केला आहे. ही SUV टाटा, महिंद्रा, एमजी, ह्युंदाई, मारुती सुझुकी आणि विनफास्टसारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना थेट टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे.

प्रीमियम डिझाइन आणि आकर्षक लूक

अर्बन टेक डिझाइन थीमवर आधारित या SUV मध्ये सिग्नेचर हॅमरहेड फ्रंट फॅसिया, फुल-एलईडी लाइटिंग, एरोडायनामिक सिल्हूट आणि 18 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कंपनीने ही कार 5 सिंगल टोन आणि 4 ड्युअल टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

फीचर्सची भरमार

या इलेक्ट्रिक SUV मध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 12-कलर एम्बियंट लाइटिंग, पॅनोरामिक सनरूफ, JBL प्रीमियम साउंड सिस्टम आणि वायरलेस चार्जिंगसारखी अत्याधुनिक सुविधा देण्यात आली आहे.

543 किमीपर्यंतची दमदार रेंज

टोयोटा अर्बन क्रूझर एबेलामध्ये 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, ही SUV एका चार्जमध्ये 440 ते 543 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यामध्ये 144 hp ते 174 hp पर्यंतची पॉवर आणि 193 Nm टॉर्क मिळतो. तसेच इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड्सही देण्यात आले आहेत.

सुरक्षेलाही प्राधान्य

सुरक्षेच्या दृष्टीने या SUV मध्ये 7 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assistance System) सारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

चार्जिंग आणि वॉरंटी

अर्बन क्रूझर एबेलाला एसी आणि डीसी फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. देशभरात 500 हून अधिक BEV-सक्षम सर्व्हिस टचपॉइंट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहकांना 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी, 3 वर्षांनंतर 60 टक्के अॅश्युअर्ड बायबॅक आणि बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BAAS) सारखे फायदेही मिळणार आहेत.

भारतीय ईव्ही बाजारातील टोयोटाचे हे पहिले मोठे पाऊल मानले जात असून, आगामी काळात इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now