जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वेकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे कोच फॅक्टरी (RCF), कपूरथला येथे अप्रेंटिसशिपच्या तब्बल ७३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट rcf.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्जाची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२६ आहे.

भरतीसाठी पात्रता काय?

या भरतीसाठी पात्र उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणेही गरजेचे आहे. उमेदवाराचे वय ५ सप्टेंबर २०२६ रोजी किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार पात्र उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. दहावी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२६ आहे, तर अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२६निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज कसा कराल?
अर्ज करण्यासाठी RCF ची अधिकृत वेबसाइट उघडा. त्यानंतर “Apply for online application of Act Apprentice Training” या लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करा. पुढे आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे आणि शुल्काची प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट सांभाळून ठेवा.
दहावी आणि ITI उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी रेल्वेत अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षणाची ही चांगली संधी असून, इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.











