जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२५ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ उतार सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सोन्यासह चांदी दरात घसरण झाली. सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, घसरणीनंतरही सोन्याची किंमत एक लाख रुपयांच्या वर आहे, तर चांदीची किंमत देखील सर्वोच्च पातळीवर आहे.

सोने आणि चांदीचे दर घसरले

जळगाव सराफा बाजारात आज मौल्यवान धातूंच्या किमतीत बदल झाला आहे. आज शुद्ध सोन्याचा भाव प्रति तोळा ४९० रुपयांनी कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आज सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 99,280 रुपये इतका आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीवर आहे. त्याच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे. आज चांदीचा भाव १००० रुपयांनी घसरून १,१४००० रुपये प्रति किलो झाली आहे.
यापूर्वी सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी ४०० रुपयांनी वाढले होते. तर चांदी दरात एक हजाराची वाढ झाली होती. यामुळे सोमवारी चांदीचा दर आजपर्यंत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.












