जळगाव लाईव्ह न्यूज । दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला काहीना काही बदल होत असतात. त्याच नुसार १ एप्रिलपासून करसंबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. यामध्ये एचआरएपासून ते अलाउंस अशा अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे. नवीन आयकर कायदा लागू होणार असल्यामुळे करदात्यांवर परिणाम होणार आहे.

घरगुती सुविधा आणि वापराबाबत नवीन नियम
घरगुती सुविधांमध्ये माळी, वॉचमन यांच्यासाठी दिलेल्या सेवांच्या पगारावर कर्मचाऱ्याकडून वसूल केलेली रक्कम वजा करुन कर आकारला जाईल. गॅस, वीज, पाणी बिल करपात्र असणार आहे.

HRA मध्ये बदल
जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरु अशा अनेक शहरांना उच्च एचआरए (HRA) सूटचा फायदा मिळणार आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्ती पगारातील ५० टक्के रक्कमेपर्यंत एचएसआर क्लेम करु शकतात. इतर शहरांमध्ये ४० टक्के क्लेम करु शकतात.
मुलांचे शिक्षण आणि भत्ते
नवीन नियमांनुसार मुलांचा खर्च आणि त्यासंदर्भातील भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. लहान मुलांच्या शिक्षण अलाउंसमध्ये १०० रुपयांवरुन ३००० रुपयांपर्यंत दर महिन्याला वाढ केली आहे.
कार वापरण्यावर टॅक्सचे नियम
आयकर नियम २०२६ नुसार, कर्मचारी जर आपल्या वैयक्तिक वापरासाठी किंवा ऑफिसच्या वापरासाठी कार वापरत असाल तर त्या नियमात बदल केली आहे.
कपातीसाठी आवश्यक पुरावा
नवीन आयकर नियमांनुसार,तुम्हाला कर कपातीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पुरावा सादर करावा लागेल. घरभाडे भत्ता, रजा, प्रवास, गृह मालमत्तेच्या व्याजाची कपात याची माहिती द्यावी लागणार आहे.
कंपनीची कार किंवा भाड्यावर घेतलेल्या कारसाठी क्लेम
१.६ लीटर इंजिन क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांना ५००० रुपये आणि ३००० रुपये ड्रायव्हरसाठी मिळणार आहे. १.६ लीटरपेक्षा जास्त क्षमता असलेल्या इंजिनसाठी ७००० रुपये आणि ड्रायव्हरला ३००० रुपये दिले जातात.












