तर देश वाचणार नाही – राहूल गांधी

सप्टेंबर 4, 2022 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | इडी कार्यालयामध्ये माझी 55 तास चौकशी करण्यात आली. तिथे मला बसवण्यात आलं. मात्र मी मोदींना सांगू इच्छितो की, मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही मला 500 तास जरी बसवलं तरी मला फरक पडत नाही. हा देश संविधानाचा आहे. जर आपण या विरोधात उभे राहिलो नाही. तर देश वाचणार नाही. असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला

rahul gandhi

देशामध्ये वाढलेल्या महागाईमुळे काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात आज रामलीला मैदानावर मोदी सरकार विरुद्ध हल्लाबोल करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, देशाला 70 वर्षाचा इतिहासात महागाई कधीच इतकी वाढली नव्हती. देशाला रोजगार देणाऱ्यांच्या भाजपने कणा मोडला आहे. केवळ दोन उद्योगपतीच देश चालवत आहेत. मीडिया देखील सत्य दाखवत नाही. कारण मीडिया याच दोन उद्योगपतींच्या हातात आहे. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय मोदी पुन्हा पंतप्रधान बनू शकत नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now