सुकळीला भिजपावसाने भींत कोसळली, सुदैवाने जिवीतहानी टळली!

सप्टेंबर 17, 2022 2:24 PM

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जिल्ह्यासह तालुक्यात नित्यनियमाने सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून भिजपावसामुळे कच्च्या घरांचेही नुकसान होत आहे. सुकळी येथील कोकीळाबाई समाधान कोळी यांच्या घराची मातीची भींत सकाळच्या सुमारास कोसळली सुदैवाने जिवीतहानी टळली. यामुळे आर्थिक नुकसान होऊन संसारपयोगी साहीत्याचे नुकसान झाले.

jalgaon 35 1 jpg webp
image 13 edited
सडत अलेली कपाशी

तसेच परीसरात भिज पावसामुळे केळीसह कपाशी पिकाच्या परीपक्व झालेल्या कैऱ्या झाडावरच सडत असल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. केळीवर आलेला सीएमव्ही व्हायरस,कपाशीच्या सडत असलेल्या कैऱ्यांसह गुरांवर आक्रमित झालेला लंम्पी स्किन हा रोग यामुळे पशुपालकांसह बळीराजा पुरता कोलमळला असून चिंतेत भर पडली असून शेतकरी वर्ग पुर्णत: धास्तावला आहे. दरम्यान, २० रोजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे मुक्ताईनगरला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री यांना परीसरातील उद्भवत असलेल्या समस्या काही प्रमाणात तरी सुटतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories