युवतीचा छेड काढण्यावरून दोन गट आमने-सामने

जून 19, 2022 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । शहरातील युवतीचा पाठलाग करून छेड काढणार्‍याला एका युवकाला बदडल्यानंतर समतानगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

dongataamnesamne jpg webp

शहरातील एका तरूणीची सय्यद अकबर सय्यद सलाउद्दीन (वय २२, रा. वंजारी टेकडी, समतानगर) हा तरुण सातत्याने छेड काढत होता. या संदर्भात तरूणीने रामानंद नगर पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे. मात्र त्याने काल सायंकाळी पुन्हा एकदा तिचा पाठलाग करून छेडकाढण्याचा प्रयत्न केला. त्याला तीन मित्रांनी मिळून बदडले. ही माहिती त्याच्या मित्राला मिळताच दोन गट आमने-सामने मारामारी झाली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले.

पोलिसांनी घटना स्थाळी धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now