⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

वन्यजीव संरक्षण संस्थेचे व्याघ्रदूतांनी केली गावागावात जनजागृती

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जागतिक व्याघ्र दिनी प्रस्तावित मुक्ताई भवानी अभयारण्य भागात व्याघ्र संवर्धन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. चारठाणा येथील शिव मंदिर परिसरात आजच्या जनजागृती कर्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी कर्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, टायगर कॉन्झर्वेशन चे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर मेळघाट चे संस्थापक रवींद्र मोहोळ, अध्यक्ष रवींद्र फालक, वनपाल डिगंबर पाचपांडे, संयोजक बाळकृष्ण देवरे योगेश गालफाडे यांच्या उपस्थितीत वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी गावा गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

नका करू शिकार वाघाची निगा राखा जंगलाची हे घोषवाक्य घेऊन लोककलावंत विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली विशेष जनजागृती आकर्षणाचा विषय ठरली. सुकळी गावात नवीन माध्यमिक विद्यालय येथे जनजागृती पथनाट्य घेण्यात आले यात 200 विद्यार्थ्यांनी वने आणि वन्यजीव रक्षणाची प्रतिज्ञा केली. मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात मुक्तांई नगर वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रॅलीचे जल्लोषात स्वागत केले.

वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्थे तर्फे संस्थेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राहुल सोनवणे, विनोद ढगे, जयेश पाटील, प्रभाकर निकुंभ , अमोल सोनवणे, या व्याघ्र दूतांचा गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला ,चारठाणा, वायला, नांदवेल, चिंचखेडा, डोलारखेडा, दुई, सुकळी, या गावातील ग्रामस्थां सोबत संवाद साधत मानव वन्यजीव संघर्ष बचाव आणि उपाययोजना याची माहिती असलेली माहिती पत्रके मोफत वितरित करण्यात आली.

वाघाची वेशभूषा केलेला मानवी वाघ अनिकेत तायडे याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. जनजागृती रॅलीत व्याघ्र दूत आणि गावकऱ्यांनी वाघाचे सर्वप्रकारे संरक्षण , संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली त्या नंतर मुक्ताई नगर येथे प्रवर्तन चौकात पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली, वरणगाव, येथे माहिती पत्रका द्वारे जनजागृती करत रॅली भुसावळ येथे जनजागृती करण्यात आली. वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव ,आणि वनविभागाच्या प्रयत्नातून आयोजित दोन दिवसीय रॅली चा समारोप भुसावळ येथे करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी मानले.

रॅली च्या यशस्वीतते साठी मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, यांनी मार्गदर्शन केले वनविभागाचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, कुऱ्हा वनपाल वनपाल डिगंबर पाचपांडे , वनरक्षक दीपाली बेलदार, वनरक्षक बापू थोरात, वनरक्षक राम आसुरे, धोंडिबा पवार, वनरक्षक विकास पाटील, वनपाल भावना मराठे, डी एम धुळगंडे वनरक्षक वडोदा, वन्यजीव संरक्षण संस्थेचे जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, निलेश ढाके, राहुल सोनवणे, ऋषी राजपूत, वासुदेव वाढे, विजय रायपुरे, अलेक्स प्रेसडी, अमन गुजर, रवींद्र सपकाळे, रवींद्र सोनवणे, अजीम काझी, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, भूषण चौधरी, ललित शिरसाठे, बबलू शिंदे, हेमराज सोनवणे, विनोद ढगे, दुर्गेश आंबेकर, रितेश भोई, आकाश आहाले, नासिक जिल्हाध्यक्ष जयेश पाटील, प्रभाकर निकुंभ, अमोल सोनवणे, प्रसाद सोनवणे, वनरक्षक जी.बी.गोसावी,वनमजुर संजय सांगळकर,अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे,वन समिती अध्यक्ष विनोद थाटे,शेतकरी पुंडलीक पाटील,महेंद्र गरुड,गजानन दुट्टे, वाहन चालक सादिक पिंजारी,महेंद्र पुरकर,सुरेश महाले आदींनी परिश्रम घेतले.