जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, एकमेकांना शिवीगाळ करणे, एकमेकांना दगडाने मारणे, एकमेकांवर कारण आरोप करणे हे सर्व प्रकार समाजातील असंस्कृत नागरिक करतात असं म्हटलं जातं. मात्र समजा हे सर्व प्रकार शिक्षक करत असतील तर पुढची पिढी घडणार कशी? असाच प्रश्न सर्वांना उद्भवत असतानाच एका सरकारी शाळेमध्ये प्राचार्य व शिक्षिका एकमेकांवर असे आरोप करत होते व मारहाण करत होते. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मध्य प्रदेशमध्ये एका सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. हा घडलेला प्रकार धक्कादायक अशी मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेत प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. चपलेने मारहाण केली. या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

देवरी विधानसभा क्षेत्रातील रसेना गावात हा संपूर्ण प्रकार घडला. उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांना एकाचवेळी विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. त्यावरून दोघांचं भांडण झालं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला शिक्षिका विनीता धुर्वे प्राचार्य हरगोविंद जाटव यांना शिव्या देत असल्याचं पाहायला मिळत आहे.या दोघांवर कारवाईची मागणी केली जात आहे.व हि केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.













