जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । रिक्षात बसलेल्या पाळीव कुत्र्यास हाकलल्याचा राग आल्यामुळे मालकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारून दुखापत केल्याचा दाखल गुन्ह्यात तब्बल साडेसहा वर्षांनंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयितास सोमवारी अटक केली. गिरीश अशोक गायकवाड (रा. नवीन जोशी कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

६ ऑक्टोबर २०१५ रोजी गायकवाड याचा पाळीव कुत्रा सुरेश मधुकर गायकवाड यांच्या रिक्षात बसला होता. यावेळी सुरेश यांनी कुत्र्यास हाकलले. याचा राग आल्यामुळे गायकवाड याने सुरेश यांना दगड मारून दुखापत केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून गिरीश बेपत्ता झाला होता. तो एक दिवसापूर्वीच जळगावात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी त्याला नवीन जोशी कॉलनी परिसरात अटक केली.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू









