व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड लांबवली

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हि घटना घडली.

अधिक माहिती अशी की , व्यापारी दुकान उघडत होता यावेळी त्याने एका दुकानाचे शटर उघडले, दुसरे शटर उघडत असताना ही घटना घडली. अवघ्या काही क्षणातच पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी गायब केली.गौरव डेडीया असे व्यापाऱ्याचे नाव आहे.

धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गौरव डेडीया यांचे अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकान आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.