---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

लग्न कर, अन्यथा.. प्रेयसीला कंटाळून प्रियकराने घेतलं विष ; मुक्ताईनगरातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२३ । मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, असा सारखा तगादा लावणार्‍या प्रेयसीला कंटाळून 28 वर्षीय प्रियकराने किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणाने दिलेल्या जवाबावरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

crime jpg webp

याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये एक वर्षांपासून प्रेम निर्माण झाले मात्र तरुणीने लग्नासाठी तगादा सुरू केला तसेच लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, अशी मागणी केली तसेच रक्कम न दिल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

---Advertisement---

गुरुवार, 7 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिखली शिवारातील शेतात तरुणासोबत पुन्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला व लग्न न केल्यास चार लाखांची मागणी केली तसेच तरुणीसोबतच्या मैत्रिणीनेदेखील चिथावणी दिली. धमकीला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने किटकनाशक प्राशन केले व त्यास उपचारार्थ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तरुणाने दिलेल्या जवाबावरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रघुनाथ पवार करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---