महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौऱ्यात हेलिकॉप्टरला झाला बिघाड !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। जर पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ बँकांनी मागितला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अजिंठा विश्रामगृहात झालीयावेळी आमदार एकनाथराव खडसे, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरिपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे मिळावे. खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. असे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांनी १ जूननंतरच पेरणी करावी. खरीप हंगाम तोंडावर असताना, बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा, पावसाचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पावसाचे अंदाज शेतकऱ्यांना वेळोवेळी कळत राहिले, तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल, असेही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे आमदार पाटील, आमदार खडसे यांनी सूचित केले. मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळीचा जळगाव जिल्ह्यातील १८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने २० कोटी ४२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

Related Articles

Back to top button