⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जिल्ह्यातील ‘हे’ रेल्वे क्रॉसिंग गेट १० दिवस बंद राहणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव- धुळे महामार्गावरील गरताडजवळील रेल्वे फाटक २७ फेब्रुवारी ते ८ मार्च असे १० दिवस बंद राहणार आहे. या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावरील गरताडजवळील रेल्वे फाटक क्रमांक १९ बी हे यांत्रिक कामासाठी २७ फेब्रुवारी सकाळी ६ ते ८ मार्च २०२२ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद राहिल, असे पत्रक चाळीसगाव रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजिनिअर यांनी काढले आहे. दरम्यान धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा याच रेल्वे गेटवरून जातो. या मार्गावरून दिवसभरात हजारो वाहने धावतात. मात्र, दहा दिवस गेट बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होणार आहे. पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.