मुक्ताईनगर । सुभाष धाडे। गेल्या अनेक वर्षापासून कोळी समाजातर्फे समाजातील लग्न कार्य, सामाजिक कार्यक्रम यासाठी हक्काची वास्तू मिळावी अशी मागणी होत होती. परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही. परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांचा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या अनेक महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता.
या पाठपुराव्याला यश आले असून दि.११ मे २०२२ रोजी शासन निर्णय जाहीर झाला असून यात ५० लक्ष रुपयांचा मल्टी पर्पज हॉल मंजूर झाला असून आपल्या मागणीला आमदारांनी प्राधान्य दिल्याने समाजातर्फे आनंद व्यक्त केला जात असून मतदार संघातील अनेक गावातील कोळी समजातील प्रतिष्ठित मंडळींनी आमदारांचे निवासस्थानी येवून आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य सत्कार केला व आमदार महोदय यांचेप्रति आभार व्यक्त पर भावना व्यक्त केल्या.
प्रसंगी कोळी समाज माजी तालुकाध्यक्ष भगवान भोलाने, संजय कांडेलकर, डॉक्टर दिलीप तायडे, पी. एस. शिरसाट अप्पा, राजेंद्र प्रभाकर कांडेलकर, गोपाळ सोनवणे, जीवराम कोळी, शिवाजी पाटील(कोळी) इच्छापुर, सुर्यकांत पाटील-कोळीसरपंच चारठाना, शेषराव कांडेलकर , महेंद्र कोळी(मोंढाळे), सुरेश कोळी सर, एम बी तायडे सर, लक्ष्मण पिंप्रीकर गुरुजी, अशोक जगन्नाथ कोळी (काहूरखेडा), अशोक तायडे चींचोल, सुकलाल सांगळकर, संजय कोळी, मनोज सोळंके, दीपक कोळी, शेषराव कांडेलकर दीपक झाल्टे.
जगन कांडेलकर, रामदास सोळुंके, काशिनाथ कांडेलकर चंद्रकांत कोळी (गाते) राहुल कोळी (पुरी) अशोक झाल्टे, सुभाष सपकाळे (सुनोदा), विश्वनाथ कोळी (रणगाव), संदेश सपकाळ (सुदगाव) , सुपडू कोळी (थोरगव्हाण), मनोहर पंडित कोळी (सुलवाडी), बाजिराव अर्जुन सोनवणे,(सुकळी)चेतन कांडेलकर, कांडेलकर गुरुजी, पंकज कोळी, अर्जुन कोळी, गजानन धाडे, शुभम तायडे, भुषण कोळी, शुभम कोळी, निलेश शिरसाट (गटनेते,नगरसेवक), संतोष कोळी (उप गटनेते, नगरसेवक) गोपाळ कोळी (शेमळदे), पंकज कोळी (चांगदेव) यांच्यासह मतदार संघातील असंख्य कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.