जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । वडोदा वनक्षेत्रात असलेल्या डोलारखेडा वनपरीमंडळातील दुई व सुकळी वनहद्दीतलगतच्या शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडुन वारंवार होणाऱ्या पीकनुकसानीला आळा घालण्यात यावा, यासाठी संबंधित शेतकरी यांच्या सामुहीक मागणी नुसार जळगांव वनविभागाकडुन सौर कुंपण साहीत्य (झटका मशीन) मंजुर करण्यात आले. असून इच्छुक १३१ नग सौर साहीत्यासाठी सुमारे १९, ६५ हजार रुपयाचे ई-टेंडर काढले आहे. शासनाचे परीपत्रक प्राप्त झाल्यावर संबंधित सौर कुंपन साहीत्यांची वाटप शेतकऱ्यांना केली जाणार असल्याची माहीती जळगांव वनविभागाच्या विश्वसनीय सुत्राकडुन ‘जळगांव लाईव्ह न्युज’ला प्राप्त झाली आहे.

वडोदा वनक्षेत्रात विपुल प्रमाणात विविध वन्यप्राण्यांची संख्या असून डोलारखेडा वनपरीमंडळातील असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे तृणभक्षक प्राणी सांबर, नीलगाय, हरीण, चितळे, काळवीट, रानडुक्कर आदी तृणभक्षक प्राणी वनहद्दीलगतच्या शेती शिवारात वारंवार शिरकाव करुन शेती पीक नुकसान करतात. परीसरात पाणी उपलब्धता असल्याने बारमही केळीसह रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. वाघाचा मुक्त संचार असल्याने भीतीपोटी शेतकरी रात्री पीकसरंक्षणार्थ शेतात जाण्यास धजावत नाही.तसेच झालेल्या पीकनुसानीची भरपाई वनविभागाकडुन तोडक्याच स्वरुपात मिळते शिवाय वेळोवेळी नुकसान होऊनही शासणनिर्णयानुसार वर्षभरातुन फक्त एकदाच नुकसान भरपाई मिळते.यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता.तालुक्यातील मौजे सुकळी व दुई येथील वनहद्दीलगतच्या शेतकऱ्यांनी याबाबत जळगांव वनविभागाचे उपवनसऱक्षक विवेक होसिंग यांच्याकडे सामुहीक मागणी केली होती.त्या अनुषंगाने विवेक होसिंग यांनी वनहद्दीलगतच्या वन्यप्राण्यांकडुन वारंवार नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत प्रयत्न केले.सौर साहीत्य पुरवठ्याबाबत ई-टेंडर काढले असुन शासनाच्या परीपत्रकाची प्रतीक्षा असुन परीपत्रक निघाल्यावर सौर साहीत्यांची वाटप होणार आहे.यामुळे संबंधित शेतकरी यांना वन्यप्राण्यांच्या असलेल्या जाचातुन सुटका मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.













