⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

संकलित निधीचा उपयोग समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणार – नामविश्व शिंपी समाज फॉउंडेशन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । नामविश्व शिंपी समाज फौंडेशनतर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी सढळ हाताने केलेल्या मदत निधीचा उपयोग समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी खर्च करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच गेल्या 2 वर्षा पासून समाजात दुःखद घटना घडल्यास दुःखात असलेल्या गरीब परिवाराला एक हजार रुपये मदत देण्याचा उपक्रम भविष्यात देखील सुरू ठेवण्याबद्दल महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन सोहळ्याच्या निमित्त नामविश्व शिंपी समाज फौंडेशनतर्फे शिव कॉलनी येथील गणपती मंदिरात प्रतिमा पूजन आणि गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समाज मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून सोहळ्याची सुरवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव शिंपि यांनी भूषवले अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोचून होतकरू, गरीब समाज बांधवांना प्रेरणा देऊन आर्थिक सहाय्य करण्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार यांनी समाजातील तळागाळातील घटकांना एकत्रित करून नामविश्व शिंपि समाज फौंडेशन मार्फत त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

नगर सेवक सचिन पाटील यांनी बाळकृष्ण देवरे यांनी होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासा साठी वाचनालय आणि अभ्यासिके साठी जागा उपलब्ध करून देण्याच्या ठरावाला तात्काळ मान्यता देत जागे सोबतच पुस्तकांचा खर्च देखील मी करेल असे आश्वासन दिले. प्रास्ताविक संस्था अध्यक्ष बाळकृष्ण देवरे यांनी केले. सूत्र संचालन युदिश खैरनार यांनी आभार प्रदर्शन निलेश जगताप यांनी केले. आयुष्यभर सामान्य कार्यकर्ते राहून समाजाची अहोरात्र सेवा करणारे समाजसेवक पंडितराव सोनवणे व राजेंद्र शिंपी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊ सन्मानित करण्यात आले. तसेच समाजाचे स्व मोरा शिंपी यांना मरणोपरांत जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.

याप्रसंगी अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव शिंपी संस्था अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, नगरसेवक डॉ.सचिन पाटील, समाजसेविका अंजलीताई बाविस्कर, प्रमोद शिंपी सरकार्यवाह कोषाध्यक्ष दिलीप कापडणे प्रमोदभाऊ शिंपी किशोर शिंपी प्रमोद कापुरे राकेश शिंपी मनोज देवरे रिलायन्स टेलर्स, राजेंद्र खैरनार, शेखर शिंपी हे उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संदीप जगताप मुकेश शिंपी, युदिश खैरनार ,शरदराव कापडणे ,भूषण निकुंभ , योगेश सुभाषशेठ सोनवणे, निलेश भानुदास शिंपी , निलेश जगताप , निनाद शिंपि, राजेंद्र शिंपी , शामकांत जगताप, राकेश जगताप , जितेंद्र मांडगे, अशोक जगताप, शामकांत जगताप, भैया सोनवणे, गुरुदास, शिंपि, दत्ता खैरनार, बाळकृष्ण कापुरे, सुनील शिंपि, गौरव शिंपि, योगेश देवरे, हरीश सोनवणे, यांनी परिश्रम घेतले. १५०० समाज बांधव आणि नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.