---Advertisement---
जळगाव जिल्हा अमळनेर गुन्हे चोपडा

पुलाचे कठडे तोडून कार थेट कोसळली पुलाच्या खाली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ६ऑगस्ट २०२३। अमळनेर ते चोपडा महामार्गावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून कार थेट पुलाच्या खाली कोसळल्याची घटना रविवारी ६ ऑगस्ट रोजी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

jalgaon mahanagar palika 45 jpg webp webp

अमळनेर ते चोपडा महामार्गावरील अंबाऋषी महाराज टेकडी जवळ लहान पुल आहे. रविवारी ६ ऑगस्ट रोजी या पुलावरून कार क्रमांक (एमएच ०४ डीडब्ल्यू १३५०) ही जात असतांना अचानक कारवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून पुलाच्या खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी अपघातस्थळी गर्दी जमली होती. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---