⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘किसान रेल्वे’ची १ हजारावी फेरी आज रवाना होणार, आ.चंद्रकांत पाटलांना आमंत्रण नाही?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । ‘किसान रेल्वे’ची एक हजारावी फेरी आज गुरुवारी दुपारी ४.३० भुसावळ विभागातील सावदा स्थानकाहून सुटेल. केळीच्या १६ वॅगन्स घेऊन किसान रेल्वेची एक हजारावी फेरी दिल्लीकडे रवाना होईल.

या ऑनलाइन होणाऱ्या कार्यक्रमाल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्य मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, रावेरचे आमदार शिरीष चौधरी हे उपस्थित राहतील. दरम्यान, या कार्यक्रमात रेल्वेला आमदार चंद्रकांत पाटील यांचा विसर पडल्याने शिवसेनेच्या गोटातून नाराजीचे सूर उमटणे सुरू झाले आहे.

याबाबत असे की, मध्य रेल्वे सध्या देवळाली-मुझफ्फरपूर, सांगोला-मुझफ्फरपूर, सांगोला-आदर्श नगर दिल्ली, सांगोला-शालीमार, रावेर-आदर्श नगर दिल्ली आणि सावदा-आदर्श नगर दिल्ली अशा ६ किसान रेल्वे चालवत आहे. सावदा येथून मध्यंतरी ९०० वी गाडी सुद्धा साेडण्यात आली हाेती. आता गुरुवारी (दि.३) केळीच्या १६ वॅगन्स घेऊन किसान रेल्वेची एक हजारावी फेरी दिल्लीकडे रवाना होईल.

भुसावळ येथे डीआरएम एस.एस.केडिया व त्यांचे सहकारी उपस्थित असतील. दरम्यान, या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील यांना आमंत्रण देण्यात आलेले नाहीय. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून नाराजीचे सूर उमटणे सुरू झाले आहे. नजीकच्या काळात त्याचे पडसाद उमटू शकतात. दरम्यान, याबाबत रेल्वेची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

हे देखील वाचा :