जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । तलवार घेऊन फिरणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. समीर शहा शरीफ शहा फकीर ( वय २० रा. रायपूर ) असे संशयिताचे नाव आहे. हा कुसुंबा नजीकच्या रायपूर फाट्याजवळ तलवार घेऊन फिरत होता. दरम्यान, पोलिसांनी अटक केली. त्याच्या जवळून तलवार जप्त करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या आदेशानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सतीश गर्जे, चंद्रकांत पाटील व सिद्धेश्वर डापकर यांनी ही कारवाई केली.

हे देखील वाचा :
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
- भडगाव हादरले ! दारूच्या पैशांवरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पती अटकेत







