शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची तात्पुरती परवानगी

जुलै 5, 2025 7:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शेळगाव-जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शिवसेना (शिंदे गट) रावेर लोकसभा विभागाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांनी रुग्णवाहिकेला पुलावरून मार्गद्वारे परवानगी मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

shelgaon

खरंतर यावल ते जळगाव या अवघ्या २६ किलोमीटरच्या अंतरावर असलेला शेळगाव बॅरेजचा पूल सध्या पावसाळ्यातील दैनंदिन समस्यांमुळे बंद होता. यामुळे गंभीर रुग्णांना जळगाव येथे वेळेवर पोहोचवणे अशक्य होत होते. अनेक रुग्णांचा जीव उपचाराच्या विलंबामुळे जात असल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर नितिन सोनार यांनी रुग्णवाहिकेला पुलावरून मार्गद्वारे परवानगी मिळावी यासाठी केलेल्या पाठपुरावा सुरु आहे.

नितिन सोनार यांनी तापी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या विनंतीनंतर यावल शेळगाव-जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यामुळे यावल शहर आणि परिसरातील गंभीर रुग्ण यापुढे सुमारे ५० किलोमीटरचा वळसा घेत न राहता थेट ३० मिनिटांत जळगाव येथील शासकीय रुग्णालय किंवा इतर तातडीच्या सेवा घेण्यासाठी पोहोचू शकतील.

ही तात्पुरती परवानगी केवळ रुग्णवाहिकांसाठी असून, इतर वाहनांना अजूनही प्रवेश नाही. तथापि, प्रशासनाने या मार्गाचा वैद्यकीय गरजांसाठी प्रभावी वापर करून संभाव्य मृत्यू टाळण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now