⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

Teaser launch : धर्मवीरचा टिझर पहिला का? सर्व राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । मुंबईतील ठाण्याचा गड गेली ४० वर्षे आपल्या हाती राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. ठाणे शहर आपल्या हाती ठेवण्यात मोठे योगदान असलेले नेते म्हणजे स्व.आनंद दिघे. शिवसेनेच्या वाटचालीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंसोबत स्व.आनंद दिघे यांचे देखील मोठे योगदान आहे. स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर-मु.पो.ठाणे’ चित्रपट लवकरच सिनेमागृहात झळकणार असून त्यात प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत आहेत. धर्मवीरचा टिझर नुकतेच रिलीज करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभत आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट धर्मवीर-मु.पो.ठाणे हा लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. ‘सर्व राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात.’ अशी टॅग लाईन घेऊन हा चित्रपटाचे प्रमोशन सध्या सुरु असून प्रेक्षकांचा त्याला दमदार प्रतिसाद लाभत आहे. आनंद दिघे यांनी केलेल्या कार्याची माहिती चित्रपटाद्वारे सर्वांपर्यंत पोहचणार आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक यांनी चित्रपटात स्व.आनंद दिघे यांची भुमीका साकारली आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे.

स्व.आनंद दिघे यांना माणसं जोडण्याची कला अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा ! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. मुंबई आणि शिवसेनेत स्व.दिघे यांना मानणाऱ्या गटाचा मोठा दबदबा आहे.

स्व.आनंद दिघे हे व्यक्तिमत्व साकारणे फार अवघड होते. प्रसाद ओक यांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे टिझरवरून लक्षात येते. दि.१३ मे २०२२ रोजी चित्रपट सिनेमागृहात झळकणार असून तत्पूर्वी प्रसारित करण्यात आलेल्या टिझरला देखील मोठी पसंती लाभत आहे. अवघ्या तीन दिवसात धर्मवीरच्या टिझरला झीच्या युट्युब चॅनलवर १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इतर चॅनलवर देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

पहा ‘धर्मवीर-मुक्काम पोष्ट ठाणे’चा टिझर व्हिडीओ :