मध्यमवर्गीयांसाठी TATA ची सर्वात स्वस्त कार लॉन्च; एकाच मॉडेलमध्ये पेट्रोल, CNG अन् EV चा पर्याय

मे 28, 2026 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्यमवर्गीय कुटुंबात अनेकांचे स्वतःची कार घेण्याचे स्वप्न असते. मात्र, मर्यादित बजेटमुळे अनेकदा हे स्वप्न अधुरेच राहते. अशातच टाटा मोटर्सने मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन एक खास कार लॉन्च केली आहे. कंपनीने सर्वात स्वस्त आणि छोटी हॅचबॅक कार ‘Tata Tiago 2026’ चे नवीन व्हर्जन भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च केले आहे.

Tata Tiago 2026

टाटा मोटर्सने यावेळी ग्राहकांना एकाच मॉडेलमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक असे तीन इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे या सेगमेंटमध्ये तिन्ही प्रकारच्या पर्यायांसह उपलब्ध होणारी टियागो ही देशातील पहिली कार ठरली आहे. जुन्या टियागोची किंमत ₹४.६ लाख पासून सुरू होते, तर कंपनीने नवीन कारची किंमत ₹५ लाखांपेक्षा कमी ठेवली आहे.

नव्या टियागोला आधीपेक्षा जास्त चांगलं बनवण्यासाठी कंपनीने त्यात अनेक बदल केले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड मिळतील. त्याशिवाय कारला सुरक्षित बनवण्यासाठी हाय स्ट्रेंथ मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. खराब रस्त्यावर सुद्धा ही कार सहजतेने पळेल अशा पद्धतीने ही कार डिझाईन करण्यात आली आहे.

डिझाइन आणि वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, कंपनीने रेंजची चिंता कमी करण्याचाही प्रयत्न केला आहे. नवीन टियागो ईव्ही बॅटरीवर आजीवन वॉरंटी देते. शिवाय, ही कार फक्त ३० मिनिटांत चार्ज होऊ शकते. यात चार्जिंगचे अनेक पर्याय आहेत.

अनेक सेफ्टी फिचर्स

कारमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी असेल. ही कार डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येईल. कारच्या AMT वर्जनमध्ये पॅडल शिफ्ट आणि क्रूज कंट्रोल सारखे फिचर्स मिळतील. Tiago मध्ये अनेक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ड्रायव्हरला जास्त चांगला कॉन्फिडन्स येईल.

इंजिन आणि पॉवर

टियागोमध्ये १.२-लिटरचे तीन-सिलेंडर इंजिन आहे, जे ८६ एचपी (hp) पॉवर निर्माण करते. तिच्या सीएनजी (CNG) व्हर्जनमध्ये, ते ७५.५ एचपी (hp) पॉवर निर्माण करते. यात तीन-सिलेंडर मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. ही कार मारुती सुझुकी वॅगनआर, सेलेरिओ आणि ह्युंदाई आय१० यांच्याशी थेट स्पर्धा करते.

किंमत किती आहे?

टाटा टियागो २०२६ ही ₹४.६९ लाख (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही किंमत बेस व्हेरिएंटसाठी आहे. पेट्रोल टॉप व्हेरिएंटची किंमत ₹७.२९ लाख (एक्स-शोरूम) आहे. टाटा टियागो सीएनजीच्या किमती ₹५.७९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात आणि ₹७.९९ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जातात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now