⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा : न्या. ए. ए. शेख

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ । आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले पाहिजे असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख यांनी केले.


निमखेडी शिवारातील साईविहार काॕलनीमधील वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, दिपक धांडे, समिर देशपांडे, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, शक्ती महाजन, डाॕ. अनिता पाटील, एस. के. पाटील, वसंत पाटील, दिपक पाटील, प्रविण चौव्हाण, गणेश महाजन, मयूर पाटील, मंगल विठ्ठल बडगुजर, बापु बडगुजर उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांसह परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. निंब, करंज, पिंपळ, पुत्रवंती, बकूड, गुलमोहर, बदाम, कन्हेर, चांदणी, जास्वंत, चिंच, अशी 110 च्यावर झाडांच्या रोपांची लागवड केली.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी वृक्षसंवर्धनातुन शहर हरित करण्यासाठी प्रत्येकाने खुला भुखंड असो की आपल्या घराजवळ झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे यातुन हरित जळगावची संकल्पना साकारता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमात लोकसहभाग वाढवावा असेही महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागील सहकारी मंगलसिंग राठोड, नारायण बारसे, शंकर गवळी यांनी सहकार्य केले.