गुन्हेधरणगाव

Accident : अ‍ॅपेरिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, रिक्षाचालक युवक ठार!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । अ‍ॅपेरिक्षाला मागून अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे, रिक्षाचालक युवक ठार झाला. ही धरणगाव-चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी घडली. दरम्यान, या घटनेने तरुणाच्या अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली.

jalgaon 13 2 jpg webp

भावडू उर्फ आशिष गजानन भावसार (वय ३२, रा. पारोळा नाका, धरणगाव) असे मृताचे नाव आहे. आशिष हा ग्रामीण भागात किरकोळ धान्य विक्रीचा व्यवसाय करत होता. नेहमीप्रमाणे रविवारी तो व्यवसायासाठी जात होता. सकाळी ८.३० वाजता त्याची अ‍ॅपेरिक्षा (क्र.एम.एच.१५-ई.जी.६३०५)चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ अचानक बंद पडली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने अ‍ॅपेरिक्षा ला जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. जळगाव येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. आशिषचे पितृछत्र बालपणीच हरवले होते. त्याच्या पश्चात आई व चार बहिणी आहेत. आशिष प्रचंड कष्टाळू होता. त्यामुळे त्याच्या अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली.

Related Articles

Back to top button