⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

धक्कादायक! बनावट इंस्टाग्रामवर खाते तयार करून शेतकऱ्याच्या लेकीची बदनामी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२३ । ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच यावल तालुक्यातील कोरपावली येथील एका तरूणाच्या नावाचा व फोटो वापरून बनावट इंस्टाग्रामवर खाते तयार करून त्यांच्या मुलीची समाजात बदनामी केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली गावातील एका शेतकरी तरूणाचा फोटो व नावाचा वापर करून अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावेळी तरूण शेतकऱ्याच्या मुलीच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान टाकून तिची बदनामी केली.

हा प्रकार २३ सप्टेंबर रोजी पासून ते मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूण शेतकऱ्याने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे करीत आहे.