बीएचआर प्रकरण : भागवत भंगाळेंसह ११ जणांना जामीन

जुलै 14, 2021 2:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । बीएचआर घोटाळाप्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या प्रेम कोगटा, भागवत भंगाळेसह ११ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

bhr scam

बीएचआर प्रकरणात १७ जून रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून ११ जणांना अटक केली होती. त्यात राज्यातील अनेक बडे उद्योजक, व्यावसायिक, राजकीय समर्थक असलेल्या अनेक दिग्गजांचा समावेश होता. दरम्यान, या सर्व संशयित आरोपींनी ३० टक्क्याप्रमाणे पावत्या विकत घेतल्याने बीएचआर पतसंस्थेत विशिष्ट प्रकारे संगनमत करून घोटाळा करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणातील काहींनी ‘आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत आमचा जामीन मंजूर करण्यात यावा’ अशी मागणी केली होती. त्यात जळगावातील व्यावसायिक भागवत बंगाळे यांच्यासह अनेक संशयित आरोपींचा समावेश होता.दरम्यान, आता सर्वाचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 

जामीनामध्ये यांचा आहे समावेश

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम रामनारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now