⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नवीन मुहूर्त सापडला : ‘या’ तारखेपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत- भुसावळ पॅसेंजर (Surat- Bhusawal सुरु करण्याबाबत गेल्या आठवड्यात निर्णय घेण्यात आला होता. याबाबत मध्य रेल्वेने ६ जून रोजी नोटीफिकेशन जारी केले होते. ८ व ९ जून ही पॅसेंजर धावणार होती. त्यामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार होता. त्यापूर्वीच मात्र पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, आता सुरत भुसावळ एक्सप्रेस आता १३ जून पासून सुरु होणार असल्याचे वेस्टर्न रेल्वेने घोषित केले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर २०२० पासून रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत- भुसावळ पॅसेंजर (Surat- Bhusawal Passenger) बंद करण्यात आली होती. सध्या निर्बंध उठविण्यात आल्यानंतर अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या मात्र सुरत पॅसेंजर सुरू करण्यात आली नव्हती. या मागणीनंतर सदर गाडी सुरु करण्यात आली असून तीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्याने या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आली असून ही गाडी आता १९०५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस (Surat Bhusawal Express) अशी झाली आहे.

image 8
नवीन मुहूर्त सापडला : 'या' तारखेपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस 1

दरम्यान, ६ जून रोजी सुरत भुसावळ पॅसेंजर सुरु करण्याबाबतचे नोटीफिकेशन जारी करण्यात आले होते. त्यानुसार ८ जून रोजी गाडी क्र. १९००५/१९००६ सुरत भुसावळ पॅसेंजर धावणार होती. तर १९००६ भुसावळ सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सुरु होणार होती. मात्र अचानक वेस्टर्न रेल्वेने पुढील आदेश येईपर्यंत ही गाडी रद्द केली. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.

दरम्यान, आता अशातच वेस्टर्न रेल्वेने १० जून रोजी सायंकाळी ५.०१ वाजता जारी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये (Tweet) गाडी क्र. १९००५/ १९००६ सुरत- भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दि. १३ जून पासून पर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे घोषित (Final announcement) केले आहे. पूर्वीच्या गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत -भुसावळ या गाडीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्यामुळे या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून आत ही गाडी १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणार आहे.