Bhusawal : तरुणीला लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध, नंतर लग्नास नकार; तरुणासह तिघांवर गुन्हा

ऑगस्ट 7, 2026 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशीच एक घटना भुसावळमधून समोर आलीय. भुसावळ लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत लग्नास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणासह तीन जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ब्रजेश वत्स, ब्रजेश कुमार सिंग, सीमा ब्रजेशकुमार अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन जणांची नावे आहेत.

crime jpg webp

नेमकी काय आहे घटना?

२१ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिची आदित्य वत्स या तरुणाशी एप्रिल २०२२ मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या कुटुंबीयांनाही या नात्याची माहिती होती आणि त्यांनी लग्नास संमती दिल्याचे सांगितले जात आहे. जुलै २०२३ मध्ये दोघे पुणे येथे शिक्षणासाठी गेले होते. त्यावेळी तसेच त्यानंतरही दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू होता.

ऑगस्ट २०२३ मध्ये भुसावळ येथे असताना आरोपी आदित्यने लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर वेळोवेळी घरात कोणी नसताना असे प्रकार सुरू होते, असे फिर्यादीत नमूद आहे. २०२५ मध्ये पुण्यात कर्वेनगर येथे दोघे एकत्र भाड्याच्या घरात राहत होते. त्या काळातही पीडितेला आरोपीच्या कुटुंबीयांकडून शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले जात होते. ५ जुलै २०२६ पासून दोघे भुसावळ येथे राहत असताना १२ जुलै रोजी आरोपीचे आई-वडील पोलिसांसह पीडितेच्या घरी आले. त्यानंतर आरोपी काही वेळाने येऊन लग्नास नकार देत पीडितेच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now