जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे? हे ठरवण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगाचा मार्ग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का समाजाला जात असून एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.
सकाळपासून शिवसेनेचा ठाकरे गट हा निवडणूक आयोगाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सिब्बल यांनी त्या दिशेनेच युक्तीवाद केला होता. शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच आहेत, निवडणूक चिन्हही त्यांच्याकडेच आहे. यामुळे निवडणूक आयोग आता यावर निर्णय घेणार आहे.प्राथमिक सदस्यत्व असलेले पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पक्ष सोडूनही आयोग शिंदेंना शिवसेनेचा सदस्य मानत आहे. या सर्व प्रक्रियेत १० वी सूची महत्वाची ठरते. मनिंदर सिंग यांच्या युक्तीवादावर सिब्बल यांनी प्रत्यूत्तर दिले होते. तसेच निवडणूक आयोग फूट पडल्याचे कसे काय ठरवू शकते, असाही प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला होता.
यावर शिंदे यांनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, तसेच आज निर्णय झाला नाही तरी शिंदे गटाचे नुकसान नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील सिंघवी यांनी केला. गेल्या काही तासांपासून ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद सुरु आहे. शिवसेनेकडून युक्तीवाद करताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या सदस्यत्वावरच प्रश्न उपस्थित केला होता.