---Advertisement---
गुन्हे यावल

22 वर्षीय गरोदर विवाहितेने उचललं धक्कादायक पाऊल, गावात उडाली खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२३ । ऐन सणासुदीच्या तोंडावर 22 वर्षीय गरोदर विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन या विवाहितेने आपली जीवनयात्रा संपविली. मयत विवाहितेसह तिच्या पोटातील बाळदेखील दगावले आहे. ही धक्कादायक घटना यावल तालुक्यातील मनवेल येथे उघडकीस आली आहे. शीतल उर्फ रुपाली विजय कोळी (22) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव असून याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

manvel news jpg webp

मनवेल येथील रहिवाशी शीतल कोळी या गरोदर विवाहितेने छताच्या आडव्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तिला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

---Advertisement---

विवाहिता गरोदर होती व तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते मात्र तेदेखील दगावले आहे. विवाहितेने टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत माहिती कळू शकली नाही. यावल पोलिसात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---