श्रावण महिन्यात उघड्यावरील मांसविक्री बंद करा : मनसे

ऑगस्ट 4, 2022 5:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर शहरातील रस्त्यांच्या कडेला होणारी मांसविक्री श्रावण निमित्ताने बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.

jalgoan 15

हिंदुंचा पवित्र महिना श्रावण मास चालू असुन या महीन्यात भक्तीमय व प्रसन्न वातावरण असते. तसेच हिंदु धर्मात या पवित्र महिन्यात मासाहार वर्ज्य असल्याने महिनाभर शहरातील मासविक्रेत्यांनी रस्त्याने उघड्यावर मांस विक्री करु नये, मांसविक्री करायचीच झाली तर ती बंद खोलीत करावी असे निवेदन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड नगरपंचायत मुक्ताईनगर यांना देण्यात आले. तसेच निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांना देण्यात आली.

उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई, उपाध्यक्ष श्रीराम भोई, मंगेश कोळी,मुकेश झाल्टे, ग्रामपंचायत सदस्य समाधान भोलाने, सुदर्शन पानपाटील, सचिन पान पाटील, कृष्णा पाटील, सलमान शाह, भाईदास जहांगीर बेल दार, प्रल्हाद सदाशिव, प्रेम संतोष कोळी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories