जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशातील अग्रगण्य युद्धनौका आणि पाणबुडी बांधणी कारखाना असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने अप्रेंटिस भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ४९५ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. ८ वी उत्तीर्ण, १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (ITI) पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांसाठी रोजगाराची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना १ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार ३ गटांमध्ये विभागणी
विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ट्रेड्सची विभागणी खालीलप्रमाणे तीन गटांत करण्यात आली आहे:

१) गट ‘अ’ (१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी)
ट्रेड्स: ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर आणि स्ट्रक्चरल फिटर.
वयोमर्यादा: १ ऑक्टोबर २०२६ रोजी १५ ते १९ वर्षे.
२) गट ‘ब’ (ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी)
ट्रेड्स: इलेक्ट्रीशियन, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, वेल्डर, कोपा (COPA), सुतार आणि इतर तांत्रिक ट्रेड्स.
वयोमर्यादा: १६ ते २१ वर्षे.
३) गट ‘क’ (८ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी)
ट्रेड्स: रिगर आणि वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक).
वयोमर्यादा: १४ ते १८ वर्षे.
अर्ज शुल्क :
सर्वसाधारण, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एएफसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
उमेदवारांनी सर्वप्रथम माझगाव डॉकच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
नवीन उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी (Registration) करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवावा.
लॉगिन केल्यानंतर अर्जात सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
लागू असल्यास परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा आणि शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.












