बँक ऑफ बडोदा ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी मोठी संधी ; तब्बल 5000 पदांसाठी मेगाभरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

मे 22, 2026 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हाला बँकेत शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्याची इच्छा असेल, तर ही एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदाने हजारो शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. बँक ऑफ बडोदातील या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. bankofbaroda.bank.in या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. Bank of Baroda Apprentice Bharti

BOB

या भरती मोहिमेद्वारे देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ५,००० रिक्त पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार १९ मे २०२६ ते ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. Bank of Baroda Bharti 2026

पात्रतेचे निकष काय आहेत? | Bank of Baroda Recruitment 2026

अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. NATS पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या पदवीची तारीख १ मे २०२६ या अंतिम तारखेच्या चार वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.

बँक ऑफ बडोदामधील अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा भविष्यात करिअरमध्ये फायदा होणार आहे.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹८०० आहे, तर याच प्रवर्गातील महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांना ₹६०० भरावे लागतील. SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना ₹२०० भरावे लागतील.

या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्टद्वारे होणार आहे. १०० गुणांची परीक्षा असणार आहे. यासाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना दर महिन्याला १५००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे. काही महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करा.
फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now