23 ऑगस्टला HDFC बँकेच्या ‘या’ सेवा बंद राहतील ; तुमचंही खातं असेल तर घ्या जाणून..

ऑगस्ट 22, 2025 5:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । जर तुमचंही बँक खातं देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी (HDFC) बँकेत असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे आज २२ ऑगस्ट रात्री ते उद्या २३ ऑगस्ट सकाळपर्यंत बँकेच्या काही डिजिटल सेवा सिस्टम अपग्रेडसाठी बंद राहणार आहेत. त्यानुसार आज रात्रीपासून ते उद्या सकाळपर्यंत ग्राहकांना या सेवा वापरण्यात अडचण येऊ शकते.

hdfc bank 1 jpg webp

या सेवा उपलब्ध राहणार नाहीत?

ग्राहक या काळात फोन बँकिंग आयव्हीआर, ईमेल सपोर्ट, सोशल मीडिया चॅनेल, व्हॉट्सअॅप चॅट बँकिंग आणि एसएमएस बँकिंग या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मात्र, हरवलेल्या किंवा फसव्या खात्यांची व कार्डांची तक्रार नोंदवण्यासाठीची टोल-फ्री हेल्पलाइन नेहमीप्रमाणे सुरु राहील.

इतर सेवांमध्ये बदल

याशिवाय, २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता ते पहाटे १.३० वाजेपर्यंत यूपीआय व्यवहारांवर परिणाम होणार आहे. या काळात एचडीएफसी बँकेच्या खात्यांद्वारे आणि रुपे क्रेडिट कार्डद्वारे केले जाणारे यूपीआय पेमेंट्स तसेच मोबाईल बँकिंग अॅप किंवा थर्ड-पार्टी अॅप्स जसे की GPay, PhonePe, Paytm यांच्यामार्फत होणारे व्यवहार थांबणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी एचडीएफसी-लिंक्ड यूपीआय पेमेंट्सही या वेळेत कार्यरत राहणार नाहीत.

ग्राहक मात्र नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग अॅप, पेझॅप, माय कार्ड तसेच थेट एजंट फोन बँकिंग यांचा वापर कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतील. बँकेने ग्राहकांना सूचित केले आहे की, कोणतेही महत्त्वाचे व्यवहार या नियोजित डाउनटाइमपूर्वी पूर्ण करावेत, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now