..तर आता महानगरपालिका तुमच्या मालमत्तेवर करणार ‘धडक कारवाई’

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२३ । 100% शास्त्री माफीची अभय योजना देऊन सुद्धा जे थकबाकीदार थकबाकी भरायला तयार नाहीत. अशांवर धडक कारवाई शनिवारपासून करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी याबाबतच्या सूचना दिली आहेत.

मनपा सभागृहात प्रभाग समिती क्रमांक एक ते चार अंतर्गत आलेले मालमत्ता कर थकबाकीवसुली संदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वसुली नियंत्रक अधिकारी, प्रभाग अधिकारी, पथक प्रमुख, कर अधीक्षक व सर्व प्रभाग समिती लिपिक उपस्थित होते

यावेळी बैठकीमध्ये अभय शास्ती योजनेस शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद लाभला याबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

17 मार्चपर्यंत निव्वळ वसुली 75 कोटी 48 लाख झालेली पाहायला मिळाली. यावर आठ कोटी सत्तावीस लाख रुपये नागरिकांना शास्ती माफ झालेली आहे. एकूण वसुली 93 कोटी पर्यंत झालेली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक असला तरी 31 मार्चपर्यंत वसुली शंभर कोटी रुपयांपर्यंत करण्याचा सूचना आयुक्तांनी दिले आहेत.

जे पथक उद्दिष्ट पूर्ण करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. जे चांगली कामगिरी करतील त्यांना प्रोत्साह दिले जाईल. असा सूचना आयुक्त विद्या गायकवाड यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. तसेच प्रत्येक पथकप्रमुख यांना रोज पाच मालमत्ता थकबाकी दारात वर अधिनियम अंतर्गत धडक कारवाई. करण्याचे टार्गेट देण्यात आलेले आहे. शहरातील मालमत्ता थकबाकीदार धारकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा याकरिता शनिवार व रविवारी दोन वाजेपर्यंत प्रभाग समिती सुरु असणार आहे.