जळगावात उद्या ‘चीज स्लाइस’ या भावस्पर्शी एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन

जुलै 24, 2026 3:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकर रसिकांसाठी दोन पिढ्यांच्यामध्ये अडकलेल्या व चाळीशीत असलेल्या ‘सॅण्डविच जनरेशन’ची मानसिकता प्रभावीपणे मांडणाऱ्या ख्यातनाम अभिनेते समीर देशपांडे लिखित व अभिनीत ‘चीज स्लाइस’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक: शनिवारी, २५ जुलै २०२६ सायंकाळी ७:०० वाजता केसीई सोसायटीचे आय.एम.आर. महाविद्यालय, ऑडिटोरियम हॉल नं. १०, जळगाव येथे हा प्रयोग होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दर्जेदार नाट्यप्रयोगाचा अवश्य आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, जळगाव जिल्हा शाखातर्फे करण्यात आले आहे.

Cheese Slice

लेखक व अभिनेते समीर देशपांडे यांचा परिचय:

जळगावात प्राथमिक, माध्यमिक व मेकॅनिकल इंजिनियरिंग पर्यंत पदवी शिक्षण घेतलेल्या समीर देशपांडे गेल्या वीस वर्षांपासून मराठी आणि हिंदी भाषांतील नाटक, चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांत अभिनेता म्हणून सक्रिय आहेत.

त्यांच्या अभिनय प्रवासात प्रामुख्याने १२० बहादूर, दृश्यम् २, खुफिया, सॅटेलाइट शंकर, बुलबुल हे चित्रपट तर त्यांचे आगामी चित्रपट वीर मुरारबाजी आणि सेक्शन ८४ हे आहेत. यासोबतच त्यांनी लाखों में एक, सिटी ऑफ ड्रीम्स, खोताची वाडी या वेबसिरीजमधून अभिनय केला आहे.

छोट्या पडद्यावरही सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत अहिल्याबाईंचे वडिल मानकोजी शिंदे यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी साकारली असून, स्टार प्लसवरील ‘मेहंदी है रचने वाली’, क्राइम पेट्रोल, निवेदिता माझी ताई आणि इतर अनेक हिंदी व मराठी मालिका त्यांनी केल्या आहेत. टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी प्रतिष्ठेचे ‘म. टा. सन्मान’ नामांकन प्राप्त झाले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now